मुंबईत कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन, मोटारसायकल बहाद्दराला अटक

पवईमधील हिरानंदानी भागात कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन आणि अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मोटारसायकल बहाद्दराला काल संध्याकाळी पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Jul 20, 2017, 04:31 PM IST
मुंबईत कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन, मोटारसायकल बहाद्दराला अटक  title=

मुंबई : पवईमधील हिरानंदानी भागात कॉलेज विद्यार्थिनी समोर अश्लील वर्तन आणि अश्लील शेरेबाजी करणाऱ्या मोटारसायकल बहाद्दराला काल संध्याकाळी पोलिसांनी अटक केली आहे. 

कल्पेश गोपीनाथ देवधरे असे अटक करण्यात आलेल्या  २७ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून, मुंबईभर विनयभंगाचे त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.१३ जुलैला ४ विद्यार्थिनी कॉलेजमधून घरी परतत असताना, हिरानंदानीतील इटर्निया इमारतीजवळ पाठीमागून निळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या एका तरुणाने त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करत अश्लील शेरेबाजी केली होती. 

ज्याबाबत विद्यार्थिनीनी आपल्या पालकांच्या मदतीने पवई पोलिसांना माहिती दिल्यानंतर पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला होता. परिसरात मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेजमधून पोलिसांना यामाहा कंपनीची ‘आर १५’ मॉडेलची मोटारसायकल असल्याचे स्पष्ट झाले होते. विद्यार्थिनीनी आपल्या जवाबात मोटारसायकलच्या नंबरचे शेवटचे चार क्रमांक दिले होते. 

मॉडेल आणि क्रमांकाशी मिळत्याजुळत्या किती मोटारसायकलची नोंदणी झाली आहे, याची पोलिसांनी माहिती मिळवली होती. त्याच आधारावर पनवेल, मालाड, गोवंडी, सांताक्रूझ या भागात आमची वेगवेगळी पथके शोध मोहीम राबवत असताना काल सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि हवालदाराच्या पथकाच्या हाती कल्पेश लागला.