'मास्तरांएवढा पगार पोलिसांनाही करा' - इंदुरीकर महाराज

हभप इंदुरीकर महाराज यांचे यूट्यूबवरील व्हिडीओ दररोज ४० लाख लोक पाहतात, असा दावा इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात केला आहे.

Updated: Jul 13, 2018, 03:46 PM IST

मुंबई : हभप इंदुरीकर महाराज यांचे यूट्यूबवरील व्हिडीओ दररोज ४० लाख लोक पाहतात, असा दावा इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात केला आहे. त्याचं सोबत इंदुरीकर महाराज यांनी वायरमन, एसटी चालक-वाहक आणि पोलिसांचे पगार वाढवण्याची गरज कशी आहे, ते आपल्या अनोख्या कॉमेडी अंदाजात सांगितले आहे.

एसटी वाहक कधी धडकेल यांचा भरोसा नाही, वायरमनचं काम जोखिमचं तरीही यांना पगार कमी, त्यात आता एसटीवाल्यांना वाढलाय म्हणून बरंय, पण पोलिसांचं काय हो, पोलीस खातं चांगलंय, म्हणून जनतेतले काही ठिकाणावर आहेत, नाहीतर काही खरं नव्हतं. आता पोलिसांनाही ७० ते ८० हजार पगार देण्याची गरज असल्याचं इंदुरीकर म्हणतात.

मंत्र्यांचा दौरा असला, इतर धार्मिक उत्सवात पोलीस रात्रंदिवस सेवा बजावतात, त्यांना आताचा पगार न परवडणारा आहे, तेव्हा त्यांच्या पगारवाढीवर विचार व्हावा, असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.