VIDEO : Isha Ambani ची मुलं झाली एक वर्षांची, नाना नानीसोबत ग्रँड पार्टीत दिसली पहिली झलक

Isha Ambani kids first birthday party video : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा आज पहिला वाढदिवस आहे. या खास निमित्त ईशा अंबानीने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेहा चौधरी | Updated: Nov 18, 2023, 10:03 PM IST
VIDEO : Isha Ambani ची मुलं झाली एक वर्षांची, नाना नानीसोबत ग्रँड पार्टीत दिसली पहिली झलक  title=
Isha Ambani kids first birthday party Mukesh Ambani Nita Ambani With krishna aadiya to karan johar to hardik pandy video viral

Isha Ambani kids first birthday party video : ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांना लॉस एंजेलेसमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर ईशासोबत या जुळ्या मुलांचं अंबानी आणि पिरामल कुटुबांने मोठ्या थाट्यामाट्यात स्वागत केलं. ईशाने या दोघांची नावंही हटके ठेवली. ईशाच्याजुळ्या मुलांच नाव आदिया आणि कृष्णा असं आहे. या दोघांच्या नावाचा अर्थ देखील खूप खास आहे. आदिया म्हणजे पहिली शक्ती आणि कृष्णा हे परमेश्वराचं नाव आहे. या दोन्ही मुलांची नावं अतिशय चर्चेत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ambani Family (@ambani_update)

Krishna-Aadiya यांचा जन्म 19 नोव्हेंबर 2022 ला झाला. रविवारी ते एक वर्षांचे होणार आहे. पण रविवारी वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना असल्याने Krishna-Aadiya यांचा वाढदिवस शनिवारी 18 नोव्हेंबरला मुंबईत साजरा करण्यात आला. 

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा आज पहिला वाढदिवस साजरा करण्यात येतो आहे. या खास प्रसंगी ईशा अंबानीने एका ग्रँड पार्टीचे आयोजन केलय.
 ज्यात तिच्या कुटुंबासह प्रसिद्ध बॉलीवूड तारेही उपस्थित होते.

ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीशी काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये करण जोहरपासून हार्दिक पांड्यापर्यंत सर्वजण आपापल्या मुलांसोबत यासाठी आले होते. 

या पार्टीनिमित्त पहिल्यांदाच Krishna-Aadiya यांची झलक पाहिला मिळाली. आजोबा मुकेश अंबानी आणि आजी नीता अंबानी यांच्यासोबत  Krishna-Aadiya पार्टीसाठी आले होते. दोघेही अतिशय गोड आणि सुंदर दिसत होते. खास म्हणजे आजी आणि नातीने एकसारखा ड्रेस परिधान केला होता. 

या पार्टीमधील नीता अंबानीचा लूक पाहून कोणीही म्हणार नाही त्या आजी झाल्या आहेत. त्यांचं सौंदर्य आणि रुप पाहून प्रत्येक जण अवाक् झालं आहे.  आजी आजोबांचं नातं हे नातवंडांशी अतिशय खास असतं. मुकेश आणि नीता अंबानी यांचंही नातं त्यांच्या नातवंडांशी अतिशय गोड आणि सुंदर असल्याचं कायम दिसून येतं. कुठल्या सण आणि उत्सव असतो. ते नातवंडासोबत दिसतात. 

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आपल्या दोन मुलांसह ईशा अंबानीच्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला. त्याने दोन्ही मुलांसोबत पोजही दिली.