मुलुंडमध्ये आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद, आठ जखमी

 मुलुंड पूर्वेच्या नानेपाडा भागात बिबट्याने ३ जणांवर हल्ला केला आहे.  

Updated: Jan 13, 2018, 01:44 PM IST
मुलुंडमध्ये आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद, आठ जखमी  title=

मुंबई : मुलुंडच्या नाणेपाडा भागात शिरलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलंय. 

तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलंय. या बिबट्यानं आठ जणांवर हल्ला करुन त्याला जखमी केलं होतं. बालाजी कामिटे (४० वर्ष), कृष्णम्मा पल्ले (४० वर्ष), सविता कुटे (३० वर्ष) आणि गणेश पुजारी (४५ वर्ष) अशी काही जखमींची नावं आहेत. 

विशेष म्हणजे, हा बिबट्या रेल्वेलाईन ओलांडून या भागात घुसला. वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.. आणि 'डाटगन'च्या सहाय्यानं त्याला बेशुद्ध केलं.

त्यानंतर याबिबट्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली.