काही अडचण आहे का? शरद पवारांचा आमदारांना प्रश्न

शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन

Updated: Nov 24, 2019, 06:53 PM IST
काही अडचण आहे का? शरद पवारांचा आमदारांना प्रश्न title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पवईच्या रेनिसान्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन केलं. तुम्हाला काही अडचण आहे का? तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? असे प्रश्न शरद पवारांनी आमदारांना विचारले. त्यावर काही आमदारांनी अजित पवारांचा फोन आला होता, असं सांगितलं. मात्र आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, असं या सगळ्या आमदारांनी पवारांना सांगितलं.

तर घाबरू नका, आपलं हे नातं आणि युती दीर्घकाळ टिकणारी आहे, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. या बैठकीनंतर पवार आणि ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा देखील झाली. तत्पूर्वी काल दिवसभर अजित पवारांसोबत असलेले धनंजय मुंडे यांच्याशीही पवार-ठाकरेंनी चर्चा केली.