मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तर हार्बर मार्गाच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Updated: Jul 9, 2017, 09:50 AM IST
मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक title=

मुंबई : मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तर हार्बर मार्गाच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. रेल्वेच्या तीनही मार्गांवर ब्लॉक दरम्यान रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायर संबंधित कामे केली जातील. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११.३५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक आहे. परिणामी या मार्गावरील जलद वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. 

पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल अप-डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल उशिराने धावतील. त्यामुळे आवश्यकता असेल तरच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. ट्रेन क्रमांक ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. तर ट्रेन क्रमांक ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून चालवण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत एक्स्प्रेस-ट्रेनलाही सुमारे २०-३० मिनिटे उशिराने धावतील.