Sharad Pawar Live : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 39 आमदारांच्या बंडानंतर राज्यात नविन सरकार अस्तित्वा आलं. त्यानंतर खातेवाटप बाकी असतानाच राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील या चर्चेला उधाण आलं. राज्यातील परस्थिती आणि त्या परस्थितीतून निर्माण झालेले सरकार हे टिकावू नसून अल्पावधीतच मध्यावधी निवडणुका लागतील असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं.
याबद्दल बोलताना शरद पवार यांनी आपण राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं आपण बोललोच नसल्याचं म्हटलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली
मध्यावधी निवडणुका होतील असं मी म्हणालोच नव्हतो, दोन अडीच बाकी आहेत, त्याच्या तयारीला आतापासून लागलं पाहिजे, याचा अर्थ मध्यावधी निवडणूका नव्हे, अडीच वर्ष आहेत, आपली पूर्ण तयारी असली पाहिजे, त्यादृष्टीने कामाला लागा अशी सूचना आपण केल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीमुळे मविआमधून बाहेर पडल्याच्या बंडखोर आमदारांच्या आरोपांनाही शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. सांगायला काही नव्हतं, म्हणून कोणी हिंदुत्वाचा विषय सांगतं, कोणी राष्ट्रवादीचा विषय सांगतं, कोणी निधी मिळाला नाही म्हणून सांगतं, जो काय निर्णय घेतला त्या निर्णयाला काही आधार नाही लोकांसमोर काही तरी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, याशिवाय दुसरा काहीही मुद्द नाही, प्रभावशाली काही मिळालं नाही म्हणून असे आरोप करण्यात आल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.
विधानसभा निवडणुकीला तिघांनी मिळून एकत्र राहण्याची प्रक्रिया कधीतरी सुरु करावी असा आमच्या मनात विचार होता, ही गोष्ट खरी आहे. एकत्र लढावं असं माझं वैयक्तिक मत आहे. पण असे निर्णय एकाने घ्यायचे नसताता, सर्वांनी बसून घ्यायचे असतात पण ती प्रक्रिया प्रत्यक्ष सुरु झालेली नाही असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.