नितेश राणेंचा बीएमसीच्या कारभारावर हल्लाबोल, सेनेवरही टीका

कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आक्रामक पावित्रा घेतला आहे. राणे यांनी मुंबई महापालिकेवर चांगलीच आगपाखड केलीये.

Updated: Jan 2, 2018, 01:53 PM IST
नितेश राणेंचा बीएमसीच्या कारभारावर हल्लाबोल, सेनेवरही टीका title=

मुंबई : कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आक्रामक पावित्रा घेतला आहे. राणे यांनी मुंबई महापालिकेवर चांगलीच आगपाखड केलीये.

‘हॉटेल्समध्ये अनधिकृत प्रकार आणि नियमांचे उल्लंघन होत होते, त्या चोरीत महापालिका सहभागी होती. अंडर टेबल डिल होत होती’, असा आरोप त्यांनी लावला आहे. तर येणाऱ्या १५ तारखेला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले नितेश राणे?

सर्व आधीका-यांवर ACB ने कारवाई केली पाहिजे. १५ दिवस दिले ते म्हणजे सेटलमेंट साठी दिले आहेत, जे सेटलमेंट करणार नाहीत त्यांच्यावर महापालिका कारवाई करणार. १५ दिवसानंतर सर्व गोष्टी सुरळीत होणार. बीएमसीकडून कारवाईचे फक्त ढोंग केले जात आहे. ही सर्व कारवाई धूळफेक आहे. ३०-३१ तारखेला तुटलेली हॉटेल्स आज सुरळीत सुरु आहेत. तसेच आयक्तांचे विधान खूप आश्चर्यकारक असल्याचे राणे म्हणाले. त्यांनी अधिका-यांनी भ्रष्टाचार केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिलीये. 

नितेश राणेंचे बीएमसीला प्रश्न?

MRTP कायद्याअंतर्गत निलंबन आणि जेलमध्ये टाकले पाहिजे.आपण सर्व जनतेचे सेवक. अन्याय थांबवणे आपले काम आहे. कारवाई न करण्यासाठी आयुक्तांना फोन येत आहेत, त्यामुळे माझा मुद्दा आहे की आयुक्त कार्यालय कुणाचे आहे ? १४ मृत्यू झाल्यानंतर जाग येणार का ? काही खास लोकांची सेवा होते आहे का ? कारवाई दबाव आणणाऱ्या लोकांची यादी जाहीर करा. हा बाळा खोपडे कोण आहे ? तो सर्व परवानग्या मिळवून देतो. बाळा खोपडेची चौकशी झाली पाहिजे. कमला मिल आगीची चौकशी पारदर्शक कारभार दिसायचा असेल तर CBI च्या माध्यमातून झाली पाहिजे.

हॉटेल मालक माफियांसारखे

आज आक्रमक शिवसेना गप्प का? मोजो आणि वन अबौ चे खरे शेअर होल्डर कोण आहेत? येणाऱ्या १५ तारखेला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. मुंबई महापालिकेला टाळे ठोकले पाहिजे. कुणाला आमच्या सोबत यायचे आहेत ते सर्व येऊ शकतात. नाईट लाईफ रुफ टॉप पॉलिसी वाईट नाही, पण तिची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी. मी नाईट लाईफचा समर्थक आहे.