चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड सीसीटीव्हीत कैद

मुंबई शहर पुन्हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय.

Updated: Jul 15, 2017, 03:33 PM IST
चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड सीसीटीव्हीत कैद title=

मुंबई : मुंबई शहर पुन्हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय.

मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरील ८ जुलैची ही घटना आहे. सीएचं शिक्षण घेणारी ही तरुणी चर्चगेट रेल्वे स्थानकात रेल्वेची वाट पाहात होती. त्यावेळी एका अल्पवयीन मुलानं या तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. 

ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालीय. मुलीनं गोंधळ घालताच या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आलीय. त्याचं नाव मांगीलाल बगारिया असं आहे. पोलिसांनी त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.