मुंबई विमानतळाला जगातल्या सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातलं सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब मिळालाय.

Updated: Mar 7, 2018, 09:11 AM IST
मुंबई विमानतळाला जगातल्या सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब title=

मुंबई : मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातलं सर्वोत्कृष्ट विमानतळाचा किताब मिळालाय.

सर्वोत्कृष्ट प्रवासी सुविधा

आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सर्वेक्षण करणाऱ्या एका जागतिक संस्थेनं हा किताब बहाल केलाय. जीव्हीके कंपनीनं उभारलेल्या या विमानतळावर जगातल्या सर्वोत्कृष्ट प्रवासी सुविधा असलेलं विमानतळ असल्याचा अहवाल एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलनं दिलाय.

इंदिरा गांधी विमानतळही अव्वल

जगात वर्षाला ४ कोटींहून अधिक प्रवासी हाताळणाऱ्या विमानतळांमध्ये मात्र दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळानं अव्वल नंबर मिळवलाय. एकूण १७६ देशातल्या १ हजार ९५३ सदस्यांच्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आलाय.