Mumbai Local : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Mumbai local News : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील ( Harbor Railway) प्रवाशांसाठी महत्वाची बातमी.  

Updated: Oct 21, 2021, 10:02 AM IST
Mumbai Local : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी title=

मुंबई : Mumbai local News : पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील ( Harbor Railway) प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) बोरिवली (Borivali) स्थानकातून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) लवकरच लोकल सुरू होणार आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारिकरणाचे काम नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार आहे.

सध्या बोरिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचण्यासाठी माहीम किंवा दादरला उतरावे लागते. गोरेगाव माहिमवरून हार्बरमार्गे आणि दादरवरून मध्यरेल्वे मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचता येते. मात्र, आता थेट बोरिवलीवरून सीएसएमटी लोकल सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एकाच लोकलने सीएसएमटीपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गाचा विस्तार हा पश्चिम रेल्वेच्या अंधेरीपर्यंत करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन आणि पनवेलवरुन अंधेरीसाठी लोकल धावत होत्या. त्यानंतर हार्बरचा विस्तार पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव स्टेशनपर्यंत करण्यात आला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत हार्बरचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन बोरिवलीला जाण्यासाठी एकच लोकल पकडावी लागेल, तशी तयारी सुरु झाली आहे.