मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. 

Updated: Apr 21, 2018, 05:04 PM IST
मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी  मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक चालणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर सकाळी १०.३७ ते दुपारी ४.०२ पर्यंत मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीपर्यंत दोन्ही मार्गांवर स. ११.१० ते दु. ४.१० पर्यंत ब्लॉक चालेल. 

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत बोरीवली ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक चालणार आहे. या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. तसंच राम मंदिर स्थानकावरही लोकल थांबणार नाही. या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.