रात्री पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक तर रविवारी मध्य-हार्बवर मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 4, 2017, 11:31 PM IST
रात्री पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक तर रविवारी मध्य-हार्बवर मार्गावर ब्लॉक title=

मुंबई : पश्चिम रेल्वेवर ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्री ११.३० ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सांताक्रूझ ते गोरेगावमध्ये अप फास्ट आणि पाचव्या रेल्वे ट्रॅकवर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत.

यामुळे गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान अप फास्ट मार्गावरील लोकल अप स्लोवरून, तर डाऊन मार्गावरील मेल-एक्सप्रेस गाड्या डाऊन फास्टवरुन चालविल्या जाणार आहेत.

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

मध्य रेल्वेवर दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा ठाण्यानंतर डाऊन धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वेमार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी स. ११.१० ते सायं. ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. चुनाभट्टी ते वांद्रे मार्गावर स. ११.१० ते सायं. ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी ११.४७ वाजता वडाळा रोड ते पनवेल या गाडीपासून सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.