मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई- पुणेकरांनो तुम्ही नक्की वाचा

Mumbai Pune News : मद्यप्रेमींची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण, त्यातही काही विशिष्ट चवीच्या मद्याला अनेकांचीच पसंती.   

सायली पाटील | Updated: Oct 27, 2023, 09:22 AM IST
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई- पुणेकरांनो तुम्ही नक्की वाचा  title=
Mumbai people prefers wine and pune people drinks local alcohol latest update

Mumbai Pune News : तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहता? तुमच्यापैकी कितीजण मद्याचं सेवन करतात? प्रासंगिक असो किंवा मग जास्त प्रमाणात असो, गेल्या काही वर्षांमध्ये मद्याचं सेवन करणाऱ्यांचा आकडा वाढला आहे. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. अशा सर्वच मद्यप्रेमींकडून विविध प्रकारच्या मद्यांना पसंती दिली जाते. यामध्ये मुंबई आणि पुणेकरांकडून द्राक्षांच्या रसापासून तयार करण्यात आलेल्या वाईनला पसंती दिली गेल्याचं समजत आहे. तर, पुणेकरांमधील एक दुसरा वर्ग मात्र 'देशी' मद्याला पसंती देत असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. 

मागील सहा महिन्यांमध्ये पुण्यातून अनेकांनीच देशी मद्याला पसंती देत भरमसाट मद्य रिचवल्याचं अहवानालून कळत आहे. 2022 आणि 23 दरम्यान 1 एप्रिलपासून 30 सप्टेंबरपर्यंतच्या काळात राज्यात झालेल्या एकूण मद्यविक्रीच्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली. 

आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी मागील सहा महिन्यांत मुंबईकरांनी तब्बल 23 लाख 58 हजार, पुणेकरांनी 11 लाख 99 हजार लिटर वाइन घेतली. विदर्भात हे प्रमाण तुलनेनं कमी आढळून आलं. जिथं 3 लाख 33 हजार आणि मराठवाड्यात 2 लाख 50 हजार लिटर वाइन घेतली.

हेसुद्धा वाचा : Babar Azam: तो एक नंबरचा स्वार्थी...; माजी खेळाडूने बाबर आझमवर लावले गंभीर आरोप

फक्त वाईनच नव्हे, तर विदेशी दारुच्या विक्रीतही मुंबई आघाडीवर असल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं. गेल्या सहा महिन्यांत शहरातील ठाणे विभागात 476 लाख 2 हजार लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. त्यामागोमाग पुणे आणि नागपूर विभागात मद्याचा सर्वाधिक खप दिसून आला. अमरावती विभागात मात्र हा खप कमी असल्याचं लक्षात आलं. थोडक्यात मद्याचं सेवन करणाऱ्यांचा आकडा मोठ्या फरकानं वाढल्याचंही इथं लक्षात आलं. 

प्रत्येकजण हा मद्याचं सेवन विविध कारणांमुळं करत असला तरीही मद्यपान करणं आरोग्यास हानिकारक आहे ही बाब मात्र विसरून चालणार नाही. त्यामुळं भान हरपून मद्यपान नकोच.