लोअर परळ पूल सोमवारपासून पाडणार

Updated: Aug 18, 2018, 04:26 PM IST

मुंबई : धोकादायक झाल्यानं गेल्या महिनाभरापासून बंद असलेला लोअर परळ रेल्वे स्थानकावरील पूल सोमवारपासून पाडण्यात येणार आहे. रेल्वे हद्दीतील गंजलेला पूल तोडण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होईल. हा पूल तोडण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

निविदा मंजूर 

पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेनं मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या कामासाठी सात कोटी २५ लाखांची निविदा मंजूर झाली आहे. तीन महिन्यात हा पूल पाडण्याचं आव्हान रेल्वेसमोर असून त्यासाठी तांत्रिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. कारण या सगळ्या कामादरम्यान रुळांचं कोणतंही नुकसान होऊ नये याची काळजीही घ्यावी लागणार आहे.