दुरांतो अपघात : तिसऱ्या दिवशी लांबपल्ल्याची एकेरी वाहतूक धिम्यागतीने

नागपूर-मुंबई दुरांतो अपघातानंतर तिसऱ्या दिवशी एकेरी वाहातूक सुरु असल्यानं लांबपल्ल्याची वाहातूक धिम्यागतीनं सुरु झालीय. दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Updated: Aug 31, 2017, 08:56 AM IST
दुरांतो अपघात :  तिसऱ्या दिवशी लांबपल्ल्याची एकेरी वाहतूक धिम्यागतीने title=

मुंबई : नागपूर-मुंबई दुरांतो अपघातानंतर तिसऱ्या दिवशी एकेरी वाहातूक सुरु असल्यानं लांबपल्ल्याची वाहातूक धिम्यागतीनं सुरु झालीय. दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पंचवटी एक्सप्रेस दोन  दिवसांनंतर रवाना झाली आहे. तर राज्यराणी आणि गोदावरी  तिसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

मंगळवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास नागपूरहून मुंबईला येणारी दुरांतो एक्स्प्रेस आसनगाव-वाशिंद या उपनगरीय स्टेशनदरम्यान घसरली. या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला होता.