मुंबईतील केईएम रुग्णालयात उघडे बाबाविरोधात राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

'केईएम'च्या आवारातील उघडे बाबाविरोधात आंदोलन,  झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर राष्ट्रवादीने आरोग्य समितीबाहेर ठिय्या मांडलाय. मुंबई महापालिका उघडे बाबाला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.

Updated: Oct 19, 2018, 04:51 PM IST
मुंबईतील केईएम रुग्णालयात उघडे बाबाविरोधात राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन title=

मुंबई : 'केईएम'च्या आवारातील उघडे बाबाविरोधात आंदोलन,  झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर राष्ट्रवादीने आरोग्य समितीबाहेर ठिय्या मांडलाय. मुंबई महापालिका उघडे बाबाला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.

केईएम रूग्णालयाच्या आवारात  असलेल्या उघडे बाबाच्या मठावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन सुरु केलंय. आरोग्य समितीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलंय. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना उघडेबाबाला पाठिशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. 'झी २४ तास'ने 'केईएम' रुग्णालयातील या उघडे बाबाची भोंदूगिरी उघडकीस आणली होती

समितीबाहेर राष्ट्रवादीचं आंदोलन सुरु असताना आरोग्य समितीमध्ये शिवसेना नगरसेवक समाधान  सरवणकर यांनी उघडे  बाबा विषयावरुन हरकतीचा मुद्दा उपस्थीत केला.