...तर पंतप्रधानपदालाही नकार देईल - नितीन गडकरी

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामाच्या धडक्यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच त्याचे किस्सेही प्रसिद्ध आहे. आपल्या किश्शांमध्ये ते हास्यांची कारंजी फुलवतात. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 27, 2017, 07:04 PM IST
...तर पंतप्रधानपदालाही नकार देईल  - नितीन गडकरी  title=

मुंबई :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामाच्या धडक्यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच त्याचे किस्सेही प्रसिद्ध आहे. आपल्या किश्शांमध्ये ते हास्यांची कारंजी फुलवतात. 

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टी निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर दिसून आलेत.  त्यावेळी गडकरी यांनी तुफान फटकेबाजी केली. 

गडकरी यांनी एका अधिकाऱ्याचा किस्सा सांगितला.  ते म्हणाले,  मी विरोधी पक्षात असताना एका अधिकाऱ्याने मला प्रचंड त्रास दिला. मला कुणी विचारले तुला पंतप्रधान व्हायचे आहे की त्या अधिकार्‍याला झोडपायचे आहे.  सांगेन मला पंतप्रधानपद नको त्या अधिकार्‍याला मला बदडायचंय. मी बोलतो ते करून दाखवतो. असे बोलल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. 

 

गडकरी म्हणाले, सध्या तो अधिकारी दिल्लीत आहे, त्याला मी बजावले आहे माझ्या तावडीत सापडलास तर सोडणार नाही. माझ्या समोर आला तर खाली मान घालून जातो.  मी वाट बघतोय तो माझ्या विभागात कधी बदली होऊन येतोय.  तो माझ्या विभागात आला तर त्याला २४ तास दारावर उभे करणार आहे, असे बोलून आपल्या रोखठोकपणाची पुन्हा एकदा झलक नितीन गडकरी यांनी दाखवून दिली.