पद्मावत वाद: करणी सेनेचे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

करणीसेनेच्या इशाऱ्यानंतर मुंबईत चित्रपटगृहांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलीसही कार्यरत झाले असून, प्रतिबंधात्मक कारवाईत शहराच्या विविध भागातून करणी सेनेचे 50 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत.

Updated: Jan 24, 2018, 04:03 PM IST
पद्मावत वाद: करणी सेनेचे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात title=

मुंबई : करणीसेनेच्या इशाऱ्यानंतर मुंबईत चित्रपटगृहांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलीसही कार्यरत झाले असून, प्रतिबंधात्मक कारवाईत शहराच्या विविध भागातून करणी सेनेचे 50 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत.

संजय लीला भन्सालींचा पद्मावत उद्या देशभरात रिलीज होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातल्या चित्रपटगृहाबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, पद्मावत सिनेमावरून सुरू झालेल्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली होती. मात्र, चोवीस तास उलटण्याआधीच मनेसेने आपली तलवार म्यान करत या वादाशी आपले काही देणेघेणे नसल्याचे दाखवले आहे. संजय लिला भन्साळींच्या पद्मावत सिनेमाला संरक्षण देण्याची भूमिका मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी आधी जाहीर केली होती. मात्र करणी सेनेनं त्याविरोधात तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना, राज ठाकरेंच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिला. करणी सेनेच्या या इशा-यानंतर आक्रमक पवित्रा घेणा-या मनसेनं घूमजाव केलं.

पद्मावत चित्रपटाशी मनसेचे काहीच देणे घेणे नाही. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत. त्यामुळं सरकारनं काय ते पाहावं, असा अधिकृत खुलासा मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी केलाय. पद्मावती सिनेमावरून मनसेमध्ये कमालीचा गोंधळ असल्याची बाब यानिमित्तानं समोर आलीय. शालिनी ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर यांनी नेमकी परस्परविरोधी वक्तव्यं केल्यानं मनसेची नेमकी भूमिका काय, असा संभ्रम निर्माण झालाय... शालिनी ठाकरे नेमक्या काय म्हणाल्या होत्या, ते पाहूयात.