ट्रेनमध्ये जास्त सामान नेल्यास होणार सहापट दंड

आरक्षित डब्ब्यांमधून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाच लक्ष असणार आहे. 

Updated: Jun 3, 2018, 04:57 PM IST
ट्रेनमध्ये जास्त सामान नेल्यास होणार सहापट दंड  title=
मुंबई : आरक्षित डब्ब्यांमधून मर्यादेपेक्षा जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाच लक्ष असणार आहे. ८ ते २२ जूनला एक अभियान चालवून याबद्दल जनजागृती केली जाणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास तुम्हाला दंड लागू शकतो याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. कोणत्या आरक्षित डब्ब्यातून किती सामान नेता येणार याबद्द माहिती सांगण्यात येणार आहे.नोंद न करता  सामान आणल्यास कारवाई करण्यात येणार आहे. जास्त सामान नेल्याने इतर सहप्रवाशांना त्याचा त्रास होते. सिझनमध्ये स्लीपर कोच किंवा थर्ड एसीमध्ये जास्त सामान नेल्यास गॅलरी ब्लॉक होते. 

विविध श्रेणीत सामान नेण्याची मर्यादा 

श्रेणी मोफत सुट
प्रथम एसी 70 कि.ग्रॅ 15 कि.ग्रॅ
एसी 2 50 कि.ग्रॅ           10 कि.ग्रॅ
एसी 340कि.ग्रॅ 10कि.ग्रॅ
स्लीपर                     40 कि.ग्रॅ 10 कि.ग्रॅ
सामान्य 35 कि.ग्रॅ 10 कि.ग्रॅ