गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर

मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. मुंबईकरांचा उत्साह रस्त्यांवर भरुन वाहत आहेत. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली आहे.

Updated: Sep 5, 2017, 03:08 PM IST
गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं विसर्जनावर पोलिसांची नजर  title=

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देत आहेत. यावेळी सर्वांमध्येच उत्साह दिसत आहे. मुंबईकरांचा उत्साह रस्त्यांवर भरुन वाहत आहेत. यावेळी पोलिसांनी देखील सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली आहे.

गिरगाव चौपाटीवर आज हेलिकॉप्टराच्या सहाय्यानं पोलीस विसर्जनाच्या सोहळ्यावर नजर ठेवून आहेत. सकाळपासून समुद्रावर हेलिकॉप्टरची गस्त सुरू आहे. पोलिसांची मिरवणुकीवर करडी नजर आहे. पोलीस सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. साध्या वेशात देखील मिरवणुकींवर लक्ष ठेवून आहेत.