मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

 मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे.  

Updated: Oct 27, 2020, 12:58 PM IST
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय  title=
संग्रहित छाया

मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्याचवेळी हा हल्ला ड्रोनद्वारे हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे.

पुढील महिन्यात दिवसात दिवाळीचा सण आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद होते. आता अनलॉक सुरु झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात शिथिलता मिळला आहे. हळूहळू व्यवहार सुरळीत होत आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर दिवाळी हा सण येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करु शकतात. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून पोलिसांनी ड्रोनवर बंदी घातली आहे.

मुंबईत ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढविण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.