'या' बँकेचा मोठा निर्णय, खातेधारक होणार मालामाल

बँकेच्या या निर्णयामुळे खातेधारकांना मोठा आर्थिक (Money) फायदा होणार आहे. 

Updated: Nov 5, 2022, 09:06 PM IST
'या' बँकेचा मोठा निर्णय, खातेधारक होणार मालामाल title=

मुंबई  : प्रायव्हेट सेक्टरमधील (Private Bank) एका मोठ्या बँकेने (Bank) मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे खातेधारकांमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. बँकेच्या या निर्णयामुळे खातेधारकांना मोठा आर्थिक (Money) फायदा होणार आहे. एक्सिस बँकेने (Axis Bank) आपल्या एफडी गुंतवणूक (Axis Bank Fixed Deposit) योजनेच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे.  (private sector axis bank increased fd fixed deposit intrest rate know new rate)

एक्सिस बँकेने एफडीच्या व्याजदरात  115 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. बँकेने 5 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेच्या एफडींच्या व्याज दराच वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार या वाढीव व्याजदराच्या निर्णयाची अंमलबजावणी 5 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून करण्यात आली आहे. बँकेने 46 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर 115 बीपीएस पॉइंट्स वाढ केली. 

एक्सिस बँक आता सर्वसाधारण एफडी गुंतवणूकदारांना 3.50 ते 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.25 टक्के व्याज दर देत आहे. 

नवे दर जाणून घ्या

7-45 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज मिळेल. मात्र 46-60 दिवसांच्या एफडीवर 50 बीपीएस पॉइंट्सने वाढ केली आहे.त्यामुळे आता या इतक्या दिवसांच्या एफडीवर 3.50 ते 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.  

61 दिवस ते 3 महिन्यांच्या एफडीवर 50 बीपीएसने पॉइंट्सने वाढ झाली आहे. त्यामुळे आता 4 ऐवजी 4.50 टक्के दराने व्याज मिळणार आहे. तसेच 3-6 महिन्यांच्या एफडीमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने वाढ झाली आहे. त्यामुळे 4.25 टक्के असलेला व्याजदर 4.50 टक्के इतका झाला आहे. 

तसेच 6-9 महिन्यांच्या एफडीत 50 बीपीएस पॉइंट्सने वाढ केल्याने आता व्याज दर 5 टक्क्यांवरुन 5.50 टक्के इतका झाला आहे. तसेच 9-12 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या एफडी .75 बीपीएस पॉइंट्सने वाढ झाली आहे. त्यामुळे 5.50 टक्क्यांऐवजी 5.75 इतक्या दराने व्याज मिळणार आहे.