मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं?

Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली आहे. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. 

नेहा चौधरी | Updated: Nov 27, 2023, 08:01 AM IST
मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं? title=
Rain of money on investors of Mukesh Ambanis Reliance earning 26000 crores in 5 days market cap of top 10 firms

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या शेअर बाजारातील 5 दिवसांमध्ये रिलायन्स कंपनीने तगडी कमाई करत शेअर होल्डर्सवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्स असलेल्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात 175.31 अंक म्हणजे 0.26 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे 5 दिवसांत रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी 26,000 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती कमावली आहे. (Rain of money on investors of Mukesh Ambanis Reliance earning 26000 crores in 5 days market cap of top 10 firms)

टॉप-10 मधील 4 कंपन्यां झाल्या मालामाल!

टॉप-10 कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर 6 कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण झाली असून 4 कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ केली आहे. यातील एक कंपनी मुकेश अंबानी यांची रिलायन्स आहे. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)  यात आघाडीवर आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरलेट यांचा नंबर लागतो. 

रिलायन्स शेअर होल्डर्सची बल्लेबल्ले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारातील भांडवल गेल्या आठवड्यात वाढेल असून ते आता 16,19,907.39 कोटीपर्यंत गेलं आहे. कंपनीची गेल्या आठवड्याच्या तुलनेत 26,014.36 कोटी रुपयांची भर पडली आहे. तर एचडीएफसी बँक हे दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली असून मार्केट कॅप 20,490.9 कोटी रुपयांहून 11,62,706.71 कोटी रुपयांवर कमाई केली आहे. तर भारतीय एअरटेलच्या गुंतवणूकदारांनी या काळात 14,135.21 कोटी रुपयांची कमावले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 5,46,720.84 रुपयांवर गेले आहे. तर आयसीआयसीआय बँकेचे बाजारातील भांडवलात 5,030.88 कोटी रुपय झाले आहेत. तर बँकेचे भांडवल 6,51,285.29 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत.