...म्हणून राज ठाकरेंनी दिलाय व्हॉट्सअॅप नंबर

घटस्थापनेच्या मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे. राज ठाकरेंच्या फेसबुक पेजचं अनावरण करण्यात आलं आहे. रविंद्र नाट्यमंदिरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माहित नसलेल्या गोष्टी, पक्षाची धोरणं लोकांना कळावीत असं या फेसबुक पेजचा उद्देश असल्याचे राज यांनी सांगितले आहे.

Updated: Sep 21, 2017, 01:23 PM IST
...म्हणून राज ठाकरेंनी दिलाय व्हॉट्सअॅप नंबर title=

मुंबई : घटस्थापनेच्या मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे. राज ठाकरेंच्या फेसबुक पेजचं अनावरण करण्यात आलं आहे. रविंद्र नाट्यमंदिरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माहित नसलेल्या गोष्टी, पक्षाची धोरणं लोकांना कळावीत असं या फेसबुक पेजचा उद्देश असल्याचे राज यांनी सांगितले आहे.

यावेळी राज ठाकरेंनी एक व्हॉट्सअॅप नंबर देखील दिला. ज्यावरुन या फेसबूक पेजवर येणारे घडामोडी व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येणार आहेत. पण या व्हॉट्सअॅप नंबरवर इतरांना काहीही पाठवता नाही येणार आहे. त्यामुळे फेसबूक पेजसोबतच राज ठाकरेंनी व्हॉट्सअॅपचा देखील नवा प्रयोग केला आहे. राज यांनी 7666662673 हा व्हॉट्सअॅस नंबर अपडेट मिळवण्यासाठी दिला आहे.