Shiv Sena : बंडखोरांना दणका देण्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

पक्ष सोडून गेलेल्या खासदार आणिआमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उभं करतंय नवं नेतृत्व. 

Updated: Jul 28, 2022, 09:28 PM IST
Shiv Sena : बंडखोरांना दणका देण्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय title=

मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. यानंतर राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावं लागलं. यानंतर 12 खासदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंना समर्थन दिलं. या बंडखोरी करणाऱ्यांविरोधात शिवसेनेने मोठं पाऊल उचललं आहे. (shiv sena party head uddhav thackeray give order babanrao gholap to  ready for next election source info)

शिवसेना सोडलेल्या खासदार,आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उभी करतंय पर्यायी नेतृत्व शिवसेनेच्या 40 आमदारांपाठोपाठ 12 खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे आता ठाकरे गट सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात नवे पर्याय देण्यास शिवसेनेने सुरूवात केली आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले. त्यामुळे आता त्याठिकाणी आता उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलींय. त्यामुळे आता शिवसेना सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात पर्यायी उमेदवार देवून त्याला ताकद देण्यास सेनेने सुरूवात केलीय.