डिझेल दरवाढीचा फटका एसटी प्रवाशांना, तिकीटाचे दर वाढणार

डिझेलच्या वाढत्या दराचा फटका एसटी प्रवाशांनाही बसण्याची चिन्हं आहेत.

Updated: May 22, 2018, 11:36 PM IST

मुंबई : डिझेलच्या वाढत्या दराचा फटका एसटी प्रवाशांनाही बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर वाढल्यामुळे एसटीवर ४६० कोटींचा अतिरिक्त भार पडलाय. तोटा भरून  काढण्यासाठी तिकीट दरवाढीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे एसटी प्रशासन तिकीट दरवाढीबाबत गांभिर्यानं विचार करत असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिलीय. गेली सहा महिने सातत्याने डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असून देखील केवळ ऐन गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तिकीट दरवाढीची झळ बसू नये म्हणून एसटीने आतापर्यंत तिकीट दरवाढ करण्याचे टाळले आहे. यापूर्वी जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये एसटीची तिकीट भाडेवाढ झाली होती. आता मात्र सातत्याने होणारी डिझेल दरवाढ कुठे थांबेल हे निश्चित नसल्याने एसटीला नाईलाजास्तव तिकीट भाडेवाढ करणे अपरिहार्य बनले आहे.