मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Updated: Sep 21, 2018, 03:45 PM IST
मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ  title=

मुंबई : मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासाननं घेतलाय. गर्दी नसतानाच्या वेळत ४४ फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. य़ा निर्णयामुळे घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

काम रात्रीही सुरू 

मेट्रो तीनच्या कामासंदर्भात राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मेट्रो तीनच्या रात्रीच्या कामाला हिरवा कंदील दिला. त्यामुळे आता मेट्रोचे काम रात्री सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयामुळे आता मेट्रो तीनच्या कामाला गती मिळणार आहे.

काम अपेक्षित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. ध्वनी प्रदूषणामुळे काही रहिवाशांनी मेट्रो तीनच्या रात्री काम बंद ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कामावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे रात्रीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.