आईला गुंगीचे औषध देत राहत्या घरातून बाळाची चोरी, CCTV फुटेज व्हायरल

काळजाचा ठोका चुकवणारी घटना 

Updated: Dec 1, 2021, 10:06 AM IST
आईला गुंगीचे औषध देत राहत्या घरातून बाळाची चोरी, CCTV फुटेज व्हायरल  title=

मुंबई : जुन्या मोबाइलच्या बदल्यात वस्तू देण्याच्या नावाखाली, आईला गुंगीचे औषध देऊन बाळ पळवल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आईचं दुध पितं तान्ह 3 महिन्यांचं बाळं पळवल्याची घटना मुंबईच्या घोडपदेव भागात घडली आहे.

याप्रकरणात काळाचौकी पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत बाळाचा शोध घेत आहेत. बाळाची आई घरामध्ये एकटेच असताना तिचे 3 महिन्याचे लहान बाळ कॉटवर ठेवलेले होते. 

त्यावेळी एका अज्ञात महिला जुन्या मोबाइलच्या बदल्यांमध्ये कपडे ठेवण्याचे बास्केट विकण्यासाठी आली. यावर फिर्यादी यांनी बास्केट घेण्यासाठी घरातील जुने मोबाईल देण्याच्या हेतून आतल्या खोलीत गेली. 

यावेळी अज्ञात महिलेने फिर्यादीच्या पाठीमागे जाऊन त्यांच्या नाकाला गुंगीचे औषध लावले यात ती बाळाची आई  बेशुद्ध पडली. तेव्हा आज्ञात महिलेने तिचे कॉटवर ठेवलेल्या तीन महिन्याच्या मुलीचं अपहरण करून घेऊन गेले आहे. या बाबत काळाचौकी पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत

अपहरण झालेल्या मुलीचे नाव वेदा बजरंग मगदूम आहे. वेदाचे वय 3 महिने 15 दिवस असून तिचा गोरा वर्ण आहे. ही घटना जवळपास सव्वा बारा ते साडे बाराच्या दरम्यान घटना घडली  आहे. 

तक्रारदार हे घरामध्ये एकटेच असताना तसेच त्यांचे  लहान बाळ कॉटवर ठेवलेले होते, एका अज्ञात महिला जुन्या मोबाइलच्या बदल्यांमध्ये कपडे ठेवण्याचे बास्केट विकण्यासाठी आले असता तक्रारदार यांनी बास्केट घेण्यासाठी घरातील जुने मोबाईल देण्यासाठी आत मधील रूम मध्ये गेली. यावेळी अज्ञात महिलेने फिर्यादी च्या पाठीमागे जाऊन त्यांच्या नाकाला बेशुद्ध होण्याचे औषध लावले असता सदर महिला बेशुद्ध पडली. 

शुद्धीवर आल्यावर महिलेला घडलेला प्रकार लक्षात आले. कॉटवर नजर गेली असता तीन महिन्यांची वेदा तेथे नव्हती. त्यानंतर घडलेला प्रकार आईच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ आपल्या कुटुंबियांना याची माहिती दिली.