मराठा आरक्षणाचा आवाज हरपला, बीडकरांवर शोककळा; सोमवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार

रविवारी पहाटे ही बातमी आल्यावर बीडकरांसोबत राजकीय विश्वातही शोककळा पसरली. 

Updated: Aug 14, 2022, 01:02 PM IST
मराठा आरक्षणाचा आवाज हरपला, बीडकरांवर शोककळा; सोमवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार title=
trending news vinayak mete last rites funeral tomorrow 15 august in beed in marathi

मुंबई: रविवारची सकाळ ही बीडकरांसाठी धक्कादायक ठरली. बीडकरांचे लाडके नेते, मराठा आरक्षणाचा आवाज आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात निधन झालं. पुण्याहून मुंबईला जात असताना पुणे-मुंबई महामार्गावर त्यांचा गाडीला अपघात झाला. मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 

रविवारी पहाटे ही बातमी आल्यावर बीडकरांसोबत राजकीय विश्वातही शोककळा पसरली. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी 15 ऑगस्टला बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याआधी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात मेटेंचं पार्थिव पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलंय.मात्र तिथे पोस्टमार्टसाठी लागणारे एक इंजेक्शन नसल्यामुळे त्यांचं पार्थिव जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं.

आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचं बघण्यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईत एकच गर्दी केली आहे. पोस्टमार्ट झाल्यावर वडाळ्यातील त्यांचा घरात मेटेंचं पार्थिव काही वेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव बीडसाठी रवाना होणार आहे. सोमवारी दुपारी  1 वाजता मेटेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

अपघाताचा घटनाक्रम कसा होता पाहुयात...

- मराठा आरक्षणाच्या बैठकीला रात्री बीडमधून रवाना
- मेटेंसोबत त्यांचा मुलगा, सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर
- पहाटे 5 वाजता मेटेंच्या गाडीला भातन बोगद्याजवळ अपघात
- मेटेंच्या गाडीला ट्रकची डाव्या बाजूने धडक
- जवळपास अर्धा किमी अंतरापर्यंत मेटेंची गाडी फरफटत गेली
- मेटे मागच्या सीटवर होते
- अपघात होताच विनायक मेटे गाडीमध्येच खाली पडले
- या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली
- अपघातानंतर ड्रायवरनं मेटेंशी संवाद साधला
- अपघातानंतर मेटेंचा ड्रायव्हरशी संवाद
- ड्रायव्हरनं ताबडतोब 108, 100 ला कॉल केला
- 15 ते 20 मिनीटे मेटे अपघातस्थळी पडून
- तातडीनं उपचार न मिळाल्यानं मेटेंचा मृत्यू

कोण होते विनायक मेटे

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेते 
मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलन 
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष 
मेटे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावातील
शिवसेना भाजप युती सरकारच्या काळातील आमदार 
सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य