राज ठाकरेंची व्यंगचित्रातून बाबासाहेब पुरंदरेंना अनोखी मानवंदना

राज ठाकरे ()Raj Thackeray) यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना व्यंगचित्रातून अनोखी मानवंदना वाहिली आहे. 

Updated: Nov 16, 2021, 07:17 PM IST
राज ठाकरेंची व्यंगचित्रातून बाबासाहेब पुरंदरेंना अनोखी मानवंदना title=

मुंबई : राज ठाकरे ()Raj Thackeray) यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना व्यंगचित्रातून अनोखी मानवंदना वाहिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर यांच्यावर काही दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. (Unique tribute to Babasaheb Purandare from Raj Thackeray's caricature)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला, अशा शब्दांत राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

15 नोव्हेंबर रोजी उपाचारावेळीच बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली. सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभुषण आणि महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यातं आलं होतं.