Unlock : मुंबईत लोकल सेवा कधी सुरु होणार, काय म्हणाल्या महापौर पेडणेकर !

राज्यात सोमवारपासून अनलॉक (Unlock) होत असताना मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local) कधी सुरु होणार, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. 

Updated: Jun 5, 2021, 01:13 PM IST
Unlock : मुंबईत लोकल सेवा कधी सुरु होणार, काय म्हणाल्या महापौर पेडणेकर ! title=

मुंबई : राज्यात सोमवारपासून अनलॉक (Unlock) होत असताना मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local) कधी सुरु होणार, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर(Mayor Kishori Pednekar) यांनी स्पष्टीकरण देताना राज्य सरकार आणि केद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न असल्याचे सांगितले. त्यामुळे तुर्तास लोकल सेवा सर्वसामान्यांना सुरु होण्यास वेळ लागणार आहे. 

मुंबईकरांना लोकल प्रवासाची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान, सोमवारपासून लेव्हल तीन नुसार अनलॉक करणे शक्य आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. लोकल सुरु करण्याचा निर्णय हा केंद्र आणि राज्य सरकारचा असल्याचे किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.  आता आपण तिसऱ्या टप्प्यात आहोत. मुंबईला लेव्हल एकवर यायला काही आठवडे जातील. त्यामुळे मुंबईत अनलॉक होण्यास उशिर लागणार आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील नियमावली मुंबईत लागू होणार आहे, असे त्या म्हणाल्या..

मुंबई सध्या तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. यानुसार, संबंधित नियमावली मुंबई महानगरपालिका संध्याकाळपर्यंत जारी करेल, असेही महापौरांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या अनलॉकच्या आदेशानुसार, कोरोना संसर्गाचा दर 5 टक्क्यांपर्यंत आणि 75 टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे असलेले जिल्हे निर्बंधमुक्त होणार आहेत. याच जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरु होऊ शकणार आहे. मुंबईतील करोना संसर्गाचा मागील काही आठवड्यात दर साडेपाच टक्क्यांपर्यंत आहे. तर, मुंबईत अजूनही 40 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले आहेत.