Koregaon Bhima case : वरवरा राव यांना अखेर जामीन मंजूर

वरवरा राव (Varavara Rao) यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.  

Updated: Feb 22, 2021, 04:33 PM IST
Koregaon Bhima case : वरवरा राव यांना अखेर जामीन मंजूर  title=

मुंबई : वरवरा राव (Varavara Rao) यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. (Varavara Rao finally granted bail) कोरेगाव-भीमा प्रकरणात (Koregaon-Bhima case) दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले 82 वर्षीय ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव उच्च न्यायालयात आज त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली.

वरवरा राव (Varavara Rao) यांच्यावर सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital ) उपचार सुरू आहेत. तेथे उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र सरकारने त्याला दाखल केले. राव यांना जामीन देताना उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईतच राहावे आणि आवश्यकतेनुसार तपासासाठी हजर रहाण्यास सांगितले आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना अटक करण्यात आली आहे. ते दोन वर्ष जेलमध्ये आहेत. मानवतेच्या आधारावर अंतरिम जामीन देत असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाढते वय, ढासळती प्रकृतीच्या  पार्श्वभूमीवर एक कैदी म्हणून त्यांना असलेला अधिकार याचा विचार करता 50 हजारांच्या वैयक्तिक जामिनावर सहा महिन्यांसाठी जामीन देण्याता आला आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे त्यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला आपला निकाल सोमवारी सकाळी जाहीर केला. राव यांना वैद्यकीय कारणांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, राव यांना पासपोर्ट एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विना परवानगी राहत घर सोडण्यास मनाई करत मनाई करण्यात आली आहे. एनआयएच्यावतीने एएसजी अनिल सिंह यांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी तीन आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. तसेच राव यांना वाटल्यास ते पुन्हा तपासयंत्रणेकडे सरेंडर करू शकतात. किंवा सहा महिन्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात जामीन अवधी वाढविण्यासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.