ईदच्या जुलूसमध्ये महिलांच्या छेडछाडीचा आरोप; विक्रोळी स्थानकाबाहेर हिंदू संघटना आक्रमक

Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या ईदच्या निमित्तानं अनेक भागांमध्ये जुलूस पार पडल्याचं पाहायला मिळालं. पण, शहरात एके ठिकाणी घडलेल्या घटनेनं उत्साहाला गालबोट लागलं  

सायली पाटील | Updated: Sep 30, 2023, 09:55 PM IST
ईदच्या जुलूसमध्ये महिलांच्या छेडछाडीचा आरोप; विक्रोळी स्थानकाबाहेर हिंदू संघटना आक्रमक  title=
women allegedly molested during eid procession in mumbai vikroli hindu organisations demands action

Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या ईदच्या निमित्तानं अनेक भागांमध्ये जुलूस पार पडल्याचं पाहायला मिळालं. पण, मुंबईतील विक्रोळीमध्ये मात्र या जल्लोषाला गालबोट लावणारी घटना घडली. ज्याचे पडसाद शनिवारी उमटले. विक्रोळी स्थानाबाहेर हिंदू संघटना विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्याबाहेर जमा झाल्या आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहत त्यांनी इथं एका घटनेचा निषेध नोंदवला. शुक्रवारी ईदच्या जल्लोषादरम्यान काही महिलांची छेडछाड काढण्याचा आरोप केला करत त्या संदर्भात पोलिसांनी कोणाविरोधातही अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचं म्हणत संतप्त स्वरात संघटनांनी त्यांचा निषेष नोंदवला.  

काय घडलं नेमकं?

मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईटमध्ये शुक्रवारी रात्री हा संतापजनक प्रका घडला. ईदनिमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये काही टवाळखोर नराधमांनी हिंदू मुलींची छेड काढली.  धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलींची आणि महिलांची छेड काढण्यात आली त्यामध्ये एका पोलीस कर्मचारी महिलेचाही समावेश आहे. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ती विक्रोळीत आली होती. जुलूसमध्ये सहभागी असलेल्या काही टवाळखोरांनी तिची छेड काढली. यावेळी पोलीस महिलेनं आरोपीला पकडण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र दुसऱ्या एका व्यक्तीनं आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला जातोय...

दरम्यान, विक्रोळीतील छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळं हिंदू संघटना आक्रमक झाल्यात. छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला. संबंधित आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा हिंदू संघटनांनी दिला.

हिंदू संघटनांच्या आंदोलनानंतर पोलीस दल सक्रीय झालं. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केलीय. मुंबईसारखं मेट्रो शहर महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं. मात्र विक्रोळी पार्कसाईटच्या घटनेनं मुंबईच्या इभ्रतीला काळा डाग लावलाय. ईदच्या जुलूसमध्ये हिंदू मुलींच्या छेडछाडीची घटना घडावी, हे फारच दुर्दैवी आहे. त्यामुळं दोन समाजांमध्ये विनाकारण वितुष्ट वाढण्याची भीती आहे.

महिला कोणत्याही जातीधर्माच्या असोत, त्यांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांना अद्दल घडणार नाही.