भुल्लरच्या निर्णयास ८ वर्षे उशीर का?

फाशीची शिक्षा झालेला आरोपी देविंदरपालसिंग भुल्लरच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास आठ वर्षांचा प्रदीर्घ काळ का लागला , अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्र सरकारकडे केली .

Updated: Oct 9, 2011, 12:59 PM IST

झी 24 तास वेब टीम

 

फाशीची शिक्षा झालेला आरोपी देविंदरपालसिंग भुल्लरच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास आठ वर्षांचा प्रदीर्घ काळ का लागला , अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्र सरकारकडे केली . न्या . जी . एस . सिंघवीयांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानेकेंद्र सरकारला या संबंधातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे .

 

राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर पुढील आठ वर्षांत नक्की काय घडले याबद्दलजाणून घेण्यास सर्वच उत्सुक आहेत असा टोलाही सुप्रीम कोर्टाने लगावला . भुल्लरच्या पत्नीने त्याला फाशी न देता जन्मठेप दिली जावी अशी विनंती करणारी याचिका कोर्टातसादर केली आहे . त्यावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने ही विचारणा केली .

 

भुल्लर याला टाडा कोर्टाने तात्कालिन युवक काँग्रेस अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टायांच्यावरील प्राणघातक हल्ला करणारा बाँबस्फोट घडवून आणल्याबद्दल २५ ऑगस्ट ,२००१ मध्ये फाशी सुनावली होती . या हल्ल्यात ९ सुरक्षारक्षक मारले गेले होते ,तर बिट्टा यांना गंभीर दुखापत झाली होती .

 

भुल्लर याचा दयेचा अर्ज सुप्रीम कोर्टाने २६ मार्च , २००२ मध्ये फेटाळला होता .त्यावर पुनर्विचार करण्याची विनंती करणारी याचिकाही कोर्टाने फेटाळली होती .२००३ मध्ये त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला . २५ मे २००१ ला हा अर्जहीफेटाळण्यात आला . सध्या भुल्लर ' आयएचबीएएस ' मध्ये उच्च रक्तदाब ,आत्महत्येचा प्रयत्न आणि मानसिक रोगांसाठी उपचार घेत आहे . त्याची मानसिकअवस्था ध्यानात घेऊन त्याला शिक्षेतून सूट देण्यात यावी अशी विनंती भुल्लर याचीपत्नी नवनीत कौर हिने केली आहे . त्याला फाशी सुनावणे हे अमानवी आणि घटनेच्या२१ व्या कलमाचे उल्लंघन ठरेल , असेही तिने म्हटले आहे .

 

२१ व्या कलमानुसार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला फाशी देता येत नाही . त्याच्या दयेच्याअर्जावर निर्णय घेण्यास तब्बल ५ , ७०० दिवसांचा विलंब झाला . त्यामुळे भुल्लरचे मानसिक संतुलन पूर्णत : ढासळले असून आमच्या अलीकडे झालेल्या भेटीत तो प्रचंड अलिप्त , शांत आणि बोलायला नाखूश दिसल्याचे नवनीतने म्हटले आहे .