करीना झाली स्किझोफ्रेनिक 'हिरॉईन'

सेव्हन्टी एमएमवर अवतरणारी मधुर भांडारकरची ही 'हिरॉईन' आहे स्किजोफ्रेनियाची पेशंट.म्हणजेच स्वतःतच गुंग असलेली, मध्येच दुस-या विश्वात रमणारी, स्वतःशीच बोलणारी, आपल्या आजुबाजुला सतत कुणीतरी आहे याचा भास होत असणारी ही हिरॉईन.

Updated: Nov 4, 2011, 11:28 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

अ‍ॅटीट्युड, स्टाईल आणि ग्लॅमरने परीपुर्ण आयुष्य जगणारी करीना आता तयार झाली आहे ते हिरॉईनचं दुहेरी आयुष्य जगायला. एक आहे लाईट, कॅमेरापुढचं झगमगत आय़ुष्य, तर दुसरं आहे या झगमगत्या दुनियेमागचं काळं आयुष्य. म्हणजेच या दुसऱ्या आयुष्यात करीना स्किजोफ्रेनिक आजाराने त्रस्त झालेल्या हिरॉईनचं आयुष्य जगणार आहे. सेव्हन्टी एमएमवर अवतरणारी मधुर भांडारकरची ही 'हिरॉईन' आहे स्किजोफ्रेनियाची  पेशंट.म्हणजेच स्वतःतच गुंग असलेली, मध्येच दुस-या विश्वात रमणारी, स्वतःशीच बोलणारी, आपल्या आजुबाजुला सतत कुणीतरी आहे याचा भास होत असणारी ही हिरॉईन. झगमगत्या दुनियेमागचं सत्य करीना बिग स्क्रीनवर साकारणारण्यासाठी करीना झाली आहे.

 

मधुर भांडारकरच्या सिनेमातलं स्त्री पात्र म्हणजे बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी नेहमीच एक आव्हान असतं. आणि ती भूमिका नेहमीच प्रेक्षक, परिक्षकांची दाद मिळवते. तसंच पुरस्कारांचीही बरसात करते. तब्बू, रवीना टंडन, कोंकणा सेन शर्मा, प्रियंका चोप्रा आणि कंगना राणावत यासारख्या अभिनेत्रींना आपल्या कारकीर्दीतल्या सर्वोत्कृष्ट भूमिका करायला मिळाल्या त्या मधुर भांडारकरच्या चित्रपटांमधूनच. 'पेज ३' सारख्या चित्रपटातून मधुरने ग्लॅमरच्या मागचं भयाण वास्तव दाखवलं, तर 'फॅशन'मधून फॅशन जगताची उध्वस्त करणारी नशा मधुरने दाखवली. आणि आता हिरॉईनमधून चित्रपटसृष्टीच्या झगमगाटाचा अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम 'हिरॉईन' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'हिरॉईन' सिनेमातली ही भूमिका यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन ही साकारणार होती. परंतु गरोदरपणामुळे तिने या सिनेमातून माघार घेतली होती. त्यानंतर आता ही भूमिका करीना कपूर साकारणार आहे. जब वी मेटनंतर पुन्हा एकदा सर्वत्कृष्ट अभिनेत्रीचं अ‍ॅवॉर्ड करीना कपूर या सिनेमाद्वारे मिळवणार का याचीच सर्वांना उत्सुकता आहे.