कुणी तरी येणार येणार गं.....

बॉलिवूड सध्या आता रंगलय ते 'गूड न्यूज'मध्ये अहो म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी ऐश्वर्या रायने सुंदर मुलीला जन्म दिला.

Updated: Dec 10, 2011, 09:51 AM IST

झी २४ तास वेब टीम

 

बॉलिवूड सध्या आता रंगलय ते 'गूड न्यूज'मध्ये अहो म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी ऐश्वर्या रायने सुंदर मुलीला जन्म दिला. आता अशीच काहीशी गोड बातमी आहे ती म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे. हो शिल्पा आता आई होणार आहे.

 

ऐश्वर्या राय नंतर आता लवकरच अभिनेत्री शिल्पा शेट्टी गूड न्यूज देणार आहे. शिल्पा शेट्टीही प्रेग्नंट असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. राज कुंद्रा- आणि शिल्पाचं हे पहिलं अपत्य असेल. शिल्पा-आणि राज कुंद्रा आपल्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या तयारीला लागले आहेत.  त्यामुळे यावर्षी बॉलिवूडमधून आणखी एक गुड न्यूज मिळणार हे नक्की..