पूनम पांडे करून भागली, अन् देवपूजेला लागली

आपल्या वायफळ बडबडीने सदैव बातम्यांमध्ये झळकणारी पूनम पांडे एकादशीला विठ्ठल भक्तीत दंग झाली आहे. करून करून भागली आणि देवपूजेला लागली अशीच गत आता पूनम पांडेची झाली आहे.

Updated: Jul 1, 2012, 11:30 PM IST

www.24tass.com, मुंबई

आपल्या वायफळ बडबडीने सदैव बातम्यांमध्ये झळकणारी पूनम पांडे एकादशीला विठ्ठल भक्तीत दंग झाली आहे. करून करून भागली आणि देवपूजेला लागली अशीच गत आता पूनम पांडेची झाली आहे.

सध्या पूनम पांडे सध्या भक्ति रसात डुंबत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आषाढी एकादशीला सर्वजण विठ्ठलाचा भक्तीत दंग झाले आहेत. त्यामुळे मलाही विठ्ठलाचा जप करावासा वाटतो आहे, असे पूनमने एकादशीच्या दिवशी ट्विटरवर टिवटीव केली आहे.

आता पर्यंत ट्विटरवर स्वतःचे न्यूड आणि उत्तेजक फोटो अपलोड करुन प्रसिद्धी मिळवणाऱ्या पूनमने पहिल्यांदाच सोशल साईटचा वापर एका चांगल्या कामासाठी केला आहे. पूनमने फेसबूक आणि ट्विटरवर आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. या दिवशी उपवास करणा-यांनी फक्त सात्विक उपवासाचे पदार्थ खायला हवेत, असा सल्लाही पूनमने दिला आहे.

विठ्ठल पावला आणि या बयेला सद्बुद्धी दिली हे खरे. आता ती टिकावी ही विठ्ठलाकडे प्रार्थना.....