विस्तार मराठी सिनेमाचा

प्रभावी पटकथा, उत्कृष्ट अभिनय, परिणामकारक गीतं,अद्वितीय संगीत यामुळे प्रेक्षकांनी पिंजरा नावाजला.. आजंही हा सिनेमा मराठीतला क्लासिक पीस म्हणून ओळखला गेला. याच दरम्यान जब्बर पटेल नावाच्या इसमानं करमणूकपर मसाला पटांना फाटा देत एक दर्जेदार मराठी सिनेमा सिनेमा बनवला.

Updated: May 4, 2012, 12:01 AM IST

1913-1975

 

आर्थिक संकटांवर मात करुन जिद्द आणि चिकाटीनं धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके या जादुगारानं पहिला चित्रपट निर्माण केला.. हा होता पहिला मुकपट... 3 मे 1913 साली पहिल्यांदा फाळक्यांचा हरिश्चंद्र पडद्यावर झळकला..त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती मराठीत झाली..1929 साली मराठी सिनेमाची प्रभात ख-या अर्थानं झाली.. प्रभात फिल्म कंपनीची स्थापना होऊन चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली. मात्र पहिला मराठी बोलपट आयोध्येचा राजा 1932 साली झळकला.. व्ही शांताराम यांनी या सिनेमाची निर्मिती केली..आणि मग मराठी सिनेमाचा जडणघडणीचा काळ सुरु झाला..

 

 

बापूराव पेंटर, भालजी पेंढारकर, आणि व्ही शांताराम या त्रयींनी  वेगवेगळ्या विषयांवरचा चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना द्यायला सुरुवात केली.. कुंकू हा त्यांचा सिनेमा भारतभर गाजला.. माणूस मधून एक वेश्या आणि पोलिस यांची कथा पडद्यावर रेखाटली... तर आंतरजातीय अंतरधर्मीय सलोख्याची कथा सांगणा-या शेजारीतून सामाजिक संदेश द्यायाचा प्रयत्न केला. वास्तववादी विषयांना हात घालून व्ही शांताराम यांनी धाडसी पाऊल उचललं. आणि मराठी सिनेमा धाडसी बनवला.. तर बापूराव पेंटर यांनी सावकारी पाश सारख्या सिनेमातून सामाजिक समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. या सिनेमांमध्ये कथेनुसार कलादिग्दर्शनंही प्रगल्भ होत गेलं. तुकाराम या सिनेमानं तर लोकप्रियतेचा कळस गाठला. एक वर्ष हा सिनेमा चालला. तसंच परदेशातंही या सिनेमाचं कौतुक झालं. संत ज्ञानेश्वरनंही चांगलीच गर्दी खेटली... सिनेमातून निव्वळ करमणूक नाही तर त्यातून समाज प्रबोधनंही होईल याची काळजी या काळातल्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी घेतली...

 

भालजी पेंढारकरांसारखा दिग्दर्शक रमला तो भव्य दिव्य ऐतिहासिक पटांमध्ये...मोहित्यांची मंजुळा... नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, मराठा तितुका मेळवावा अशा सिनेमांतून त्यांनी शिवकालीन व्यक्तिरेखांची ओळख मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांना करुन दिली. इतिसाहीची पानं उलटताना भालजींनी आपला हातखंडा दाखवून दिला. त्यातूनंच सुलोचना, चंद्रकांत, सूर्यकांत यांसारखे मराठी तारे उदयास आले.. यावेळी होनाजी बाळाची आठवण करुन देणारा अमर भूपाळी हा सिनेमाही गाजला. याच काळात आचार्य  अत्र्यांनाही सिनेमाचं प्रेम स्वस्थ बसू देईना... त्यांनी श्यामची आई हा सिनेमा बनवला... आणि या सिनेमानं इतिहास रचला. हा सिनेमा त्याकाळचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आणि या सिनेमाचा राष्ट्रपती सुवर्ण पदकानं गौरव करण्यात आला.  राजा परांजपे यांचा जगाच्या पाठीवरनंही प्रचंड लोकप्रियता मिळवली.सुवासिनी ,मानिनी,हा माझा मार्ग एकला, एक धागा सुखाच्या या सिनेमांचीही प्रेक्षकराजानं दखल घेतली. यातून राजा गोसावी, रमेश आणि सीमा देव, शकुंतला, अरुण सरनाईक, जयश्री गडकर अशा कलाकारांना यशाच्या शिकरावर नेऊन ठेवलं. तर साठच्या दरम्यान आलेला सांगत्ये ऐका हा तर मराठी सिनेमातला मैलाचा दगड ठरला.. हा सिनेमा जवळपास 131 आठवडे तिकीट खिडकीवर चालला. साठच्या दशकात मराठी प्रेक्षकांवर प्रभाव राहिला तो तमाशापटांचा...केला.. ईशारा जाता जाता.... एक गाव बारा भानगडी...अशा सिनेमाचा उल्लेख विशेष करुन कारावा लागेल.  ग्रामीण भागाच्या पार्शवभूमीवर तमासगिरांच्या कथा या सिनेमातू रेखाटण्यात आल्या.. गावच्या सरपंचाचा नाकर्तेपणा त्यातून उद्भवणा-या समस्या यांचं चित्रण या चित्रपटातून झालं. या सिनेमातूनच निळू फुले सारखा दर्जेदार खलनायक मराठी सृष्टीला मिळाला.. अर्थात निळू फुलेंचा अभिनय इतका वाखाणम्या जोगा होता की वैयक्तीक आयुष्यातंही लोक त्यांच्या भूमिकांमुळे त्यांचा तिरक्साकर करत..

 

या दरम्यानंच पाठलाग या सिनेमात भावना आणि काशिनाथ घाणेकरांचा अप्रतिम अभिनय पहायला मिळाला...साधी माणसं मधून पुन्हा एकदा कौटुंबिक पटाला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्या नंतर मात्र मराठी सिनेमांना उतरती कळा लागली. सशक्त मराठी रंगभूमी आणि रंगीत हिंदी सिनेमा यामुळे मराठी सिनेमाकडे हळूहळू प्रेक्षक वर्ग पाठ फिरवू लागला. सत्तरच्या दरम्यान दादा कोंडकेच्या सोंगाड्य़ानं पुन्हा प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणलं.. मग काही काळ दादा कोंड

Tags: