अंबानी बंधू पुन्हा एकत्र ?

येत्या बुधवारी जूनागढ जिल्ह्यातील चोरवाड येथे मुकेश आणि अनिलसहित संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र येणार आहे. बुधवारी धीरूभाईंच्या स्मारकाचं उद्घाटन होणार असून त्यासाठी दोघेही अंबानी बंधू एकत्र येणार आहेत.

Updated: Dec 27, 2011, 03:43 PM IST

झी २४ तास वेब टीम, वडोदरा

 

येत्या बुधवारी जूनागढ जिल्ह्यातील चोरवाड येथे  मुकेश आणि अनिलसहित संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र येणार आहे. चोरवाड हे धीरुभाई अंबानींचे जन्मस्थळ आहे. बुधवारी धीरूभाईंच्या स्मारकाचं उद्घाटन होणार असून त्यासाठी दोघेही अंबानी बंधू एकत्र येणार आहेत.

 

मुकेश आणि अनिल यांची आई कोकिलाबेन धीरुभाई अंबानी म्हणाल्या की दोन्ही भावांमध्ये एकमेकांविषयी प्रम असल्यामुळेच ते दोघे एकत्र येत आहेत. २८ डिसेंबर रोजी धीरूभाईंची ८० वी जयंती आहे. या दिवशी गुरू रमेशभाई ओझा धीरूभाईंच्या स्मारकाचं उद्घाटन करतील. या समारंभाला कोकिलाबेन अंबानी, त्यांचे दोन्ही मुगे मुकेश आणि अनिल, मुलगी दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी या ही उपस्थित असतील.

 

 

रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष परिमल नथवानी म्हणाले, गेल्या काही काळापासून पहिल्यांदाच असं झालं असेल की एखाद्या कौटुंबिक समारंभाला दोघेही भाऊ एकत्र आलेत. होणारा कार्यक्रम चोरवाडी देवीच्या मंदिरात होणार आहे. कोकिलाबेनशी एका बिझनेस चॅनलशी बोलताना म्हणाल्या की मुकेश आणि अनिल दोघेही आपापल्या परीने चांगली प्रगती करत आहेत. ही सर्व भगवंताची कृपा आणि धीरूभाईंचे आशीर्वाद आहेत असं मी समजते.

 

 

दोन्ही भावंडांनी एकत्र यावं म्हणून तुम्ही काय प्रयत्न करत आहात, असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की दोन्ही भावंडांमध्ये पहिल्यापासून प्रेम आहे. म्हणूनच ते एकत्र येणार आहेत.

 

 

ज्या ठिकाणी धीरूभाईंचा जन्म झाला, त्याच ठिकाणी अंबानींचं स्मारक बनत आहे. या बंगल्याचं नाव पूर्वी मंगरोलवालो डेलो असं होतं. या बंगल्यातल्या एक भागात धीरूभाई लहानपणी भाड्याने राहात होते. २००२ मध्ये धीरूभाईंनी हा बंगला विकत घेतला. आता या बंगल्यास धीरूभाईनो डेलो म्हटलं जातं. कोकिलाबेन यांनी आपल्या पतीच्या आठवणी जतन करून ठेवण्यासाठी या स्मारकाचा पाया घातला. या स्मारकामध्ये एक गॅलेरी आणि एक ऑडिटोरिअम आहे.