आजचा सेंसेक्स

Updated: Apr 17, 2012, 10:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजार 357 अंशांवर बंद झाला. त्यात 206 अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज 5 हजार 289 अंशांवर बंद झाला. त्यात 63 अंशांची वाढ झाली. आज सकाळी बाजार मागच्या तुलनेत किंचीत वरच्या पातळीवर उघडला.

 

रिझर्व्ह बॅंकेनं वार्षिक पतधोरण जाहीर केल्यानंतर  सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास बाजारानं उसळी घेतली. पण काही वेळातच बाजार घसरायला सुरूवात झाली. दुपारच्या सत्रात बाजार पुन्हा वाढायला लागला. अखेरीस बाजार वरच्या पातळीवर बंद झाला. पतधोरणात व्याजदर कमी केल्यामुळे व्याजदराबात संवेदनशील असणा-या बॅंका आणि एटो स्टॉक्समध्ये आज तेजी होती. मात्र, सोनं खरेदीसाठी पतपुरवठा करणा-या  कंपन्यांवर पतधोरणात काही निर्बंध लावल्यामुळे त्यांचे स्टॉक्स घटले होते. पावसाचं आगमन वेळेवर होणार असल्याच्या वृत्तामुळे हिंदुस्थान युनीलिव्हर आणि नेस्ले इंडियासारख्या ग्राहकोपयोगी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वाढ झाली.

 

सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसी आणि टाटा मोटर्सनं आज उच्चांक नोंदवला. गेल्या दोन दिवसांपासून घटत असलेल्या इन्फोसिसच्या शेअर्समध्ये आज वाढ पहायला मिळाली. हेवीवेट रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये आज घट झाली तर मेटलचे स्टॉक्स वाढले होते. आज ओनजीसी,कोल इंडिया, हिंडाल्को, डीएलएफ, हिरो मोटोकॉर्प या कंपन्यांचे शेअर्स वधारलेत तर या केर्न इंडिया, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्रा, रिलायन्स या कंपन्यांचे शेअर्स घसरलेत.