www.24taas.com, नवी दिल्ली
आयकर विभागातील विविध केडरमध्ये 20,751 नव्या पदांची निर्मिती व नोकरभरती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
बैठकीनंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की, या नव्या पदांपैकी 1349 पद भारतीय महसूल सेवा (आयआरएस) आणि उर्वरित 19,402 पद बिगर आयआरएस केडरचे राहतील. अतिरिक्त पदांची निर्मिती आणि काही पदोन्नत्यांसाठी दरवर्षी 449.71 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या माध्यमातून कर वसुलीत वार्षिक 25 हजार कोटी रुपयांची वाढ होण्याची आशा आहे.
विविध मंत्रालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्गांत एकूण 75,522 पदे रिक्त आहेत. यापैकी 44,427 पदांची थेट, तर उर्वरित 31,095 पदे पदोन्नती कोट्यातून भरती केली जातील, अशी माहिती चिदंबरम यांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.