गुड न्यूज : होम, कार लोन होणार स्वस्त

एक गुड न्यूज आहे. होम, कार लोन स्वस्त होण्याचे संकेत आहेत. खाद्य पदार्थांच्या महागाई निर्देशांक उणे ३.७४ एवढा विक्रमी खाली आल्याने रिझर्व्ह बँक व बँकांकडून व्यादरात एक टक्का कपात होण्याची शक्यता बँक व गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Updated: Jan 6, 2012, 12:52 PM IST

www.24taas.com , नवी दिल्ली

एक गुड न्यूज आहे. होम, कार लोन  स्वस्त  होण्याचे संकेत आहेत.  खाद्य पदार्थांच्या महागाई निर्देशांक उणे ३.७४ एवढा विक्रमी खाली आल्याने रिझर्व्ह बँक व बँकांकडून व्यादरात एक टक्का कपात होण्याची शक्यता बँक व गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँक आपला तिमाही आढावा येत्या २४ जानेवारी रोजी जाहीर करेल. त्यात व्याजदरात एक टक्का कपातीची घोषणा होण्याच्यादृष्टीने पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे होम, कार लोन  स्वस्त  होण्याची शक्यता अधिक आहे.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्च २०११ ते २०११ मध्ये १३ वेळा व्याजदर वाढ केली आहे. २४ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात खाद्य पदार्थांच्या महागाईचा निर्देशांक उणे ३.७४ टक्क्यांनी घसरला आहे.  हा महागाईचा निर्देशांक घसरण्याची शक्यता असून पुढे मार्चपर्यंत महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याती परिस्थिती आहे,  असे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी  स्पष्ट केले.