पोटनिवडणुकीत भाजप पराभूत

देशाच्या पाच राज्यांमधील सात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसने मात्र यामध्ये बाजी मारली आहे. कर्नाटक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात भाजपने एक - एक जागा गमावली आहे.

Updated: Dec 4, 2011, 12:34 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

देशाच्या पाच राज्यांमधील सात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसने मात्र यामध्ये बाजी मारली आहे. कर्नाटक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात भाजपने एक - एक जागा गमावली आहे. बेल्लारी येथे भाजपमधून बाहेर पडलेले अपक्ष उमेदवार श्रीरामुलु जिंकले आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांच्या जनचेतना रथयात्रेचा इफेक्ट फिका पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

अडवाणी यांच्या जनचेतन यात्रेनंतर भाजपच्या शक्तीप्रदर्शनाच्या दृष्टीने या पोटनिवडणुकांचे निकाल खूप महत्वाचा होता. तसेच काँग्रसलाही भ्रष्टाचार विरोधी सुरू असलेल्या टीम अण्णांच्या आंदोलनानंतरही आपले वर्चस्व कायम असल्याचे या निवडणुकांतून दाखवून द्यायचे होते. त्यामुळे या निवडणुकांकडे साऱ्याच पक्षांचे लक्ष्य होते.

 

कर्नाटकातील बेल्लारी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात पूर्वी भाजपमधून निवडणूक लढवलीले मंत्री बी . श्रीरामुलु यांना ७४ हजार ५२७ मते मिळवत काँग्रेसचे उमेदवार बी . रामप्रसाद यांना ४६ हजार मतांनी हरवले आहे. तर भाजपचे सध्याचे उमेदवार पी.गडिलिंगप्पा हे तिसऱ्या क्रमांकावर घसरले. भाजपच्या दृष्टीने हा त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला आहे.

 

हिमाचल प्रदेशातील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा नालागड विभागात त्यांना यंदा काँग्रेसच्या लखविंदर सिंह राणा यांनी १५९८ मतांनी पराभूत केले आहे. लखविंदर यांना २८,७९७ मत मिळाले तर भाजपच्या गुरनाम कौर यांना २७,१९९ मत मिळाले.

 

तसेच रतिया विभागातही भाजपला पराभावला सामोरे जावे लागले आहे. या विभागात काँग्रेस ३० वर्षांनंतर निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. जनरल सिंह यांनी विरोधी पक्षाच्या आईएनएलडीच्या उमेदवार देवी यांनी जवळपास १२,७०० मतांनी हरवले. या ठिकाणी भाजप तिसऱया स्थानावर आहे.

 

ओरिसामध्येही भाजपला झटका बसला आहे . बिजूजनता दल यांच्या सुभाष गोंड यांनी भाजपच्या धर्मू गोंड यांना २१, ०६१ मतांनी हरवले आहे.

 

हिमाचल प्रदेशच्या रेणुका विभागात मात्र भाजपने काँग्रेसला दणका देत विजय मिळवला आहे . भाजपच्या हृदयराम यांनी काँग्रेसच्या विनय कुमार यांना ३, ५२६ मतांनी हरवले आहे.