CMपदासाठी यादव पिता-पुत्राचे ‘पहले आप’!

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणा-या समाजवादी पक्षाची बैठक सुरू झालीय़. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. तरूण नेते आणि मुलाय़मसिंग यांचे पुत्र अखिलेश यादव हेच उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Updated: Mar 7, 2012, 09:33 PM IST

www.24taas.com, लखनऊ

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणा-या समाजवादी पक्षाची बैठक सुरू झालीय़. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. तरूण नेते आणि मुलाय़मसिंग यांचे पुत्र अखिलेश यादव हेच उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. परंतु, मुलायम सिंग हेच उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार असे अखिलेश यादव यांनी कालच स्पष्ट केले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्याचा सस्पेन्स कायम आहे.

 

अखिलेश यादव यांच्या गळ्या मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्याचा निर्णय सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांनीच घेतल्याचं सांगण्यात येतंय. सपाच्या यशात अखिलेश यादव यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळं त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी असा आग्रह पक्षातल्या काही नेत्यांनी धरल्याचं बोललं जातंय़. त्यानुसार मुलायमसिंग यांनीच हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

 

उत्तर प्रदेश विधानसभेच्या काल झालेल्या मतमोजणीनंतर सपने २२४ जागा पटकावून बहूमत मिळावले. सत्ताधारी बसला ८० जागांवर रोखून सत्ता खेचून आणली. त्यानंतर आता सपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असताना नवाबांच्या शहरात बाप बेटेच पहले आप पहले आप करीत आहेत.

 

दरम्यान, यूपीतल्या पराभवानंतर मायावतींनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवलाय. त्यानंतर पत्रकार परिषद घेवून मायावतींनी पराभवामागील कारणं स्पष्ट केली.

 

तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही उत्तर प्रदेशातला पराभव मान्य केलाय. उत्तर प्रदेशात चुकीच्या लोकांना तिकीटं दिल्याने पराभव झाल्याचं सोनियांनी म्हटलंय. बसपाच्या पराभवाला काँग्रेस, भाजप आणि मीडियाच जबाबदार असल्याचा आरोप मायावतींनी केलाय. मुस्लिमांच्या मतविभाजनाचा फटका बसपाला बसल्याचही मायावतींनी म्हंटलय.

 

केंद्र सरकारनं यूपी सरकारला कधीही सहकार्य केलं नाही असं सांगत समाजवादी पार्टी यूपीला आणखी काही वर्ष मागे नेऊन ठेवेल असंही मायावतींनी म्हटलय.