दहशतवादी अबू जिंदालचं कुटुंब पळून गेलं...

मुंबईतल्या २६/११ हल्ल्यातला प्रमुख संशयित अबू जिंदालचे कुटुंबीय घर सोडून पसार झाले आहेत. अबू बीड जिल्ह्यातल्या गेवराईचा रहिवासी असून तिथं त्याचे कुटुंबीय राहत होते.

Updated: Jun 26, 2012, 06:07 PM IST

www.24taas.com, बीड

 

मुंबईतल्या २६/११ हल्ल्यातला प्रमुख संशयित अबू जिंदालचे कुटुंबीय घर सोडून पसार झाले आहेत. अबू बीड जिल्ह्यातल्या गेवराईचा रहिवासी असून तिथं त्याचे कुटुंबीय राहत होते. मात्र अबूला अटक झाल्यानंतर आता चौकशी होण्याच्या भीतीनं त्याचे कुटुंबीय गायब झाले आहेत.

 

अबू जिंदालच्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली आहे. २६/११च्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अबू हमजा हा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे. औरंगाबाद जवळच्या वेरूळ इथे मे २००६ मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता,तेव्हा पासून हमजा फरार होता. बीड शहरातील कागजी वेस भागात राहणा-या अबूला ४ बहिणी आई-वडील असा परिवार आहे.

 

गेवराई इथं पूर्वी हे कुटुंब राहत होते. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गेवराई इथं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बीड येथील बलभीम महाविद्यालयात त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नवगण महाविद्यालयात एम.एं.च्या पहिल्या वर्षाला त्याने प्रवेश घेतला होता. २००३-२००४ पासून तो इंडिअन मुजाहिदीन च्या संपर्कात आला…