आई भराडी देवी नवसाला पावली!!!!!!

कोकणची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. आंगणेवाडी यात्रेला दरवर्षी आमदार खासदार, मंत्र्यांची उपस्थिती लक्षणीय असते. यावर्षी तर मुंबई महानगरपालिकेबरोबरच कोकणात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत.

Updated: Dec 4, 2011, 07:32 AM IST

झी 24 तास वेब टीम, सिंधुदुर्ग

 

कोकणची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीची  यात्रा २५ फेब्रुवारीला होणार आहे. आंगणेवाडी यात्रेला दरवर्षी आमदार खासदार, मंत्र्यांची उपस्थिती लक्षणीय असते. यावर्षी तर मुंबई महानगरपालिकेबरोबरच कोकणात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे याचा मतदानावर परिणाम होईल अशी भीती होती.

 

मात्र नवसाला पावणाऱ्या भराडी देवीनं राजकारण्यांना दिलासा दिला. कारण यावर्षी ही यात्रा काही दिवसांनी पुढे सरकली आहे. त्यामुळे मतदार राजा आपापल्या मतदारसंघात राहणार आहे. तसंच यावर्षी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात आंगणेवाडी यात्रेनिमित्त विजयासाठी नवसाचा जागर होणार आहे. १९९५मध्ये सेनाभाजप युतीची सत्ता आल्यानंतर आंगणेवाडीच्या यात्रेला मंत्र्यांची गर्दी विशेष जाणवली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकांमुळे राजकारण्यांची यात्रेला गर्दी झाली नाही तरच नवल.