राणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !

Last Updated: Tuesday, November 8, 2011 - 12:55

झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग

 

चिपळूणमध्ये झालेल्या कार्यालयांच्या तोडफोडीनंतर आता राणे -जाधव वादाचं लोण मालवणमध्येही पसरलं आहे. नारायण राणेंचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सिंधुदुर्गमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसने राणेंना आव्हान दिलं आहे. मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणीही निलेश राणेंच्या समर्थकांनी केली आहे.

First Published: Tuesday, November 8, 2011 - 12:55
comments powered by Disqus