पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यासह दगडफेक केली. जमावानं गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये घुसून दगडफेक आणि मोडतोड केली आहे.

Updated: Feb 9, 2012, 02:23 PM IST

www.24taas.com, परभणी

 

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यासह दगडफेक केली. जमावानं गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये घुसून  दगडफेक आणि मोडतोड केली आहे. तसंच एका पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला आहे.

 

या प्रकरणात गंगाखेडचे भाजपचे नगरसेवक रामप्रभू मुंढेंसह, श्रीनिवास मुंडे, मुरलीधर नागरगोजे, श्रीकांत भोसले यासह अन्य काही जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीमुळे गंगाखेडमध्ये सध्या प्रचंड तणावाचं वातावरण असून शहरात वाढलेल्या पोलीस बंदोबस्तानं शहराला छावणीचं स्वरूप आलं आहे.

 

दरम्यान शहरातील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे. निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतसं प्रचार कार्यांना काही ठिकाणी हिंसक वळण लागत आहे. मात्र, पोलीस स्टेशनमध्ये घुसून मोडतोड होत असेल, तर यावरून पोलिसांची समाजकंटकांना भीती उरलेली नाही, याचा प्रत्यय येतो.