अजित पवारांचा उद्घाटनांचा धडाका

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये उदघाटनांचा धडाका लावलाय. अजितदादांनी आज शहरात तब्बल दहापेक्षा जास्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं.

Updated: Dec 3, 2011, 04:15 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे 

 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये उदघाटनांचा धडाका लावलाय. अजितदादांनी आज शहरात तब्बल दहापेक्षा जास्त प्रकल्पांचं उद्घाटन केलं.  ख़डकवासला पोटनिवडणुकीतील परावभवानंतर पिंपरी चिंचव़डच्या बालेकिल्ल्यात कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. दौऱ्यात अजितदादांनी राष्ट्रवादीतल्या सर्वचगटांना चुचकारण्य़ाचा प्रयत्न केलाय.

 

उद्घाटनांच्या समारंभात अजितदादांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं तोडभरुन कौतुक केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कामाची पंतप्रधानांनी दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.या अधिकाऱ्याचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.